गुरुवार, 14 मार्च 2019

संसद सदस्यांचे विशेषाधिकार.

संसद सदस्यांचे विशेषाधिकार कोणते?

भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला देश आहे. राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा मिळून संसदेची निर्मिती झाली आहे. कायदेनिर्मितीच्या कार्यात संसदेची सर्वांत महत्त्वाची भूमिका असते. संसद सदस्याकडे कोणते संसदीय अधिकार असतात हे आपण येथे अभ्यासणार आहोत.
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १०५ मधील प्रकरण २ मध्ये विशेषाधिकार दिलेले आहेत.
(१) भाषण देण्याचा अधिकार
(२) संसदेतील कारवाईच्या प्रकाशनाचा अधिकार
भारतीय राज्यघटनेत संसदीय विशेषाधिकाराची संकल्पना ब्रिटनच्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहे. संसद आणि सदस्यांची सर्वोच्चता कायम राहावी यासाठी या यामागील हेतू आहे.
संसद विशेषाधिकार म्हणजे संसद सदस्याला दिलेले विशेष अधिकार असतात. संसदेच्या एखाद्या समितीत बोलणाऱ्या, त्यात योगदान देणाऱ्या सदस्याला, भारताचे महान्यायवादी आणि केंद्रीय मंत्री यांचा समावेश आहेत. राष्ट्रपतीला संसदेचा अभिन्न घटक मानले जात असले तरी त्यांना संसदीय विशेषाधिकार देण्यात आलेले नाही.
संसदीय विशेषाधिकार मुख्यतः दोन भागांत विभाजित करण्यात आले आहे.
१) संसदेच्या सदस्यांना विशेषाधिकार सामूहिकरीत्या मिळतात.
२) संसद सदस्य विशेषाधिकारांचा व्यक्तिगतरीत्याही उपयोग करू शकतो.
संसद सदस्याचे सामूहिक विशेषाधिकार खालीलप्रमाणे आहेत :
१) संसदीय सदनात पीठासीन अधिकारीच्या परवानगीशिवाय संसद सदस्याला एखादा व्यक्ती ( सदस्य qकवा बाह्य व्यक्ती) बंदी बनवू शकत नाही. तसेच त्याच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा करता येत नाही.
२) कोणत्याही न्यायालयाला सदन किंवा समितीच्या कार्यवाहीची चौकशी करण्याचा अधिकार नाही.
३) संसद कारवाई करून अतिथीला बाहेर काढू शकते. राष्ट्रहितासाठी गुप्त बैठकही आयोजित करू शकतो.
४) संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या विशेषाधिकारांचे उल्लंघन, सभागृहाचा अनादर केल्या प्रकरणात संसदेला त्याच्या सदस्यास किंवा बाहेरील व्यक्तीस सूचना देण्याचा आणि दंड देण्याचाही अधिकार आहे. संसद सदस्य असल्यास त्याला पदावरून हटविण्याचाही अधिकार आहे.
संसद सदस्याचे व्यक्तिगत अधिकार कोणते?
१) संसदेचे सत्र सुरू असताना संसद सदस्याचा विशेषाधिकार प्राप्त व्यक्ती न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणात उपस्थित राहण्यास किंवा पुरावा सादर करण्यास मनाई करू शकतो.
२) संसद सदस्याला संसद कारवाई दरम्यान ४० दिवसांच्या आधी आणि कारवाई बंद झाल्याच्या ४० दिवसांनंतर अटक करता येत नाही. हा अधिकार केवळ नागरी प्रकरणात उपलब्ध आहे. गुन्हेगारी कृत्यात नाही.
३) एखादा सदस्य संसदेच्या सभागृहात किंवा समितीच्या समोर त्याचे मत मांडत असेल तर यासाठी त्याच्यावर कोणत्याही न्यायालयात कारवाई होणार नाही.
कोणत्या स्थितीत संसदेच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन होते?
१) एखादा व्यक्ती अथवा अधिकारी संसद सदस्याच्या व्यक्तिगत अथवा सामूहिक विशेषाधिकाराचे हनन करीत असेल, त्याच्याविषयी अपशब्द वापरत असेल तर त्याच्या या कृतीला संसदेच्या विशेषाधिकारचे उल्लंघन मानले जाईल.
२) देशात संसदेप्रति सन्मान राहावा आणि जनप्रतिनिधीची प्रतिष्ठा कायम राहावी, यासाठी संसदीय विशेषाधिकाराचा उल्लेख करण्यात आला आहे.
मात्र अनेकदा जनतेने निवडून दिलेले संसद सदस्य निवडून आल्यानंतर जनतेची आणि शासकीय अधिकाऱ्यांचा आदर करताना दिसत नाही. यामुळे संसदीय विशेषाधिकारात बदल करावे, अशी मागणी केली जात आहे.
@ data from internet

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें

सदस्यता लें टिप्पणियाँ भेजें [Atom]

<< मुख्यपृष्ठ